करडा गावाच्या मातीत शिक्षणाचा सन्मान.

 

प्रतिनिधी स्वाती गायकवाड 

रिसोड, दि. ५ सप्टेंबर : तालुक्यातील करडा येथे भारताचे माजी राष्ट्रपती तथा थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाच्या औचित्याने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
विठ्ठल मानमोठे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षकांच्या ज्ञानदानाच्या कार्याचा गौरव व्हावा आणि समाजात शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
अत्यंत साध्या व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास डॉ. रवी गरकळ, गजानन मालक, पांडुरंग मानमोठे, विशाल मालक, विठ्ठल मानमोठे, गणेश मानमोठे, गणेश कदम, कृष्णा देशमुख आदी उपस्थित होते.
शिक्षणाचे महत्त्व आणि शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

थोडे नवीन जरा जुने