UBN News Network
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय वाशिम यांच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे तसेच अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अविनाश पुरी,बाह्य संपर्क अधिकारी डॉ.प्रसाद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम शहरात तंबाखूविरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली.ही कारवाई आरोग्य विभाग पोलिस ,अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. मोहीमेअंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल,पोस्ट ऑफिस,जलसंपदा व बाधकाम विभाग कार्यालय,पाटणी चौक,सिंधी कॉलनी,अकोला नाका येथे कारवाई करण्यात आली. यावेळी सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम (कोटपा) 2003 अंतर्गत कलम 4, कलम 6अ व कलम 6 ब चे उल्लंघन करणाऱ्या पानटपरी धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण २ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कलम 4 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे- तर कलम 6 अ नुसार 18 वर्षांखालील अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास मनाई आहे. तसेच कलम 6 ब नुसार शाळा महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री प्रतिबंधित करण्यात आली आहे.

या कारवाईत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. आदित्य पांढरकर,मानसशास्त्रज्ञ राम सरकटे,सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे,अन्न सुरक्षा अधिकारी व्ही.जे.राठोड तसेच पोलिस विभागाचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव पोलिस कॉन्स्टेबल तुषार ठाकरे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.सार्वजनिक ठिकाणी व नियमांचे उल्लंघन करून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येईल तंबाखू नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर पथकाची करडी नजर असून नियमांचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन आहे.