प्रतिनिधी :स्वाती गायकवाड
धोडप बु. ता. रिसोड जिल्हा परिषद वाशिम शिक्षणाधिकारीप्रा.विठ्ठलराव भुसारे यांच्या संकल्पनेतून 'गावाची वेस ओलांडून,ज्ञानाचे क्षितिज गाठण्याचा ध्यास घेत धोडप बु. येथे ‘जागर शिक्षणाचा...! ज्ञान, गुणवत्ता आणि विकासाचा..!’ हा अभिनव उपक्रम दि. २७ ऑगस्ट रोजी संत गजानन महाराज संस्थान येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
ग्रामीण विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणवत्तेला वाव मिळावा, शिक्षण केवळ पुस्तकी न राहता कौशल्य, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव निर्माण करणारे असावे, गावातील शाळांना गावकऱ्यांचे सहकार्य असावे आणि गावकऱ्यांच्या पुढाकाराने शाळेसाठी काही करता येईल का या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. *‘जागर शिक्षणाचा’ म्हणजे केवळ कार्यक्रम नव्हे, तर ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा देणारी चळवळ* असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
अशाच प्रकारच्या शिक्षण विषयक उपक्रमांचे आयोजन गावोगावी व्हावे व बदलत्या परिस्थितीनुसार मुलांमध्ये नवनवीन कौशल्य कशा पद्धतीने आत्मसात होतील या बाबींवर आताच्या पालकांनी कसा भर द्यावा याबाबत सुद्धा उपस्थित वक्त्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले या ठिकाणी उपस्थित गावकऱ्यांनी सायंकाळी ६ ते ८ या वेळात घरातील टीव्ही व मोबाईल न वापरण्याबाबत ठराव संमत केला कार्यक्रमा मध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे स्त्रियांची लाभलेली उपस्थिती त्याचबरोबर गावकरी व शिक्षणप्रेमी सुद्धा भरपूर संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणाधिकारी प्रा. विठ्ठलराव भुसारे यांनी बदलत्या काळानुसार शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत नाविन्य आणण्याची गरज असल्याचे सांगितले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी सुंदर धवन व डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.
गटशिक्षणाधिकारी बद्रीनारायण कोकाटे, केंद्रप्रमुख उमाकांत काष्टे, सरपंच स्वप्निल बोडखे, पोलीस पाटील शामराव बोडखे, मंदिर समिती अध्यक्ष गजानन बोडखे, तंटामुक्ती अध्यक्ष विलास बोडखे, पं.स. सदस्य राहुल बोडखे, शा.व्य.स. अध्यक्ष मनोज बोडखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन जि.प. प्राथमिक शाळा व स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालय, धोडप बु. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अमोल अंभोरे,सूत्रसंचालन मुख्याध्यापक सज्जनराव बाजड यांनी तर आभार मा.पं.स.राहुल बोडखे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी सर्व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.
