Ad Code

एरंडोल येथे लांडापूरा भागात ४ वर्षीय बालिकेवर बलात्कार..

    माणुसकीला काळीमा फासणारी घटना. 

प्रतिनिधी- विवेक रा महाले

मार्च 11, 2026

एरंडोल – येथे लांडापूरा भागात माणुसकी व नातेसंबंधाला काळीमा फासणारी अशी घटना मंगळवारी १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजे दरम्यान घडली.एकनाथ रामू मोरे ( वय ५९ वर्षे) याने त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या भाचीच्या मुलीला घरी कुणी नसल्याचा गैरफायदा घेऊन त्याच्या घरात बालिकेला बोलावून हे निंदनीय कृत्य केले.आरोपी एकनाथ मोरे याला अटक करण्यात आली.आरोपीला ताब्यात द्या.या मागणीसाठी सदर पिडीत मुलीचे संतप्त नातेवाईक व आदिवासी बांधवांनी येथे अमळनेर नाका परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर जवळपास अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली.अमळनेर विभागाचे डि वाय एस पी विनायक कोते यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून आरोपीवर कायदेशीर कठोर कारवाई केल्याचे आश्र्वासित केले.त्यामुळे संतप्त जमावाने रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.

लांडापूरा भागात पिडीत बालिकेचे कुटुंब राहत असून ती घरात एकटी असल्याची संधी साधत एकनाथ मोरे या नराधमाने तिला त्याच्या घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला.तिची आई घरी परतल्यावर तिची मुलगी घरात न दिसल्याने ती शोधाशोध करू लागली.तोपर्यंत तिचे पती सुध्दा घरी परतले.त्या दोघांनी शेजारी राहणाऱ्या एकनाथ मोरे याच्या घरात प्रवेश केला असता सदर घृणास्पद प्रकार घडल्याचे उघडकीस आले.

याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार हे पुढील तपास करीत आहेत,यावेळी रास्ता रोको करणाऱ्यां युवकांना पो. हवलदार अनिल पाटील,पो नाईक योगेश महाजन, पो. काँ. पंकज पाटील, दिपक पाटील, भाऊसाहेब मिस्तरी, सुमेर वाघरे, अनिल मोरे रस्ता मोकळा करण्यास समजूत घातली..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या