शेतकरी माझा बाप उभ्या जगाचा पोशिंदा आज संकटात.
महाराष्ट्र : राज्यातील अनेक भागांत पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने खरीप हंगामातील पिकांवर पाण्याअभावी संकट निर्माण झाले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पिके वाळू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला काही भागांत समाधानकारक पाऊस झाला; मात्र ऑगस्टमध्ये पावसाची मोठी तूट निर्माण झाली. त्यानंतर अनेक ठिकाणी पावसाचा खंड पडल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून सोयाबीन, कापूस, तूर, मका यांसह विविध खरीप पिकांवर परिणाम होत आहे.
पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. हातातोंडाशी आलेले पीक पाण्याअभावी वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून, उत्पादनात घट झाल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पिकांचे नुकसान झाल्यास तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी, तसेच पावसाची स्थिती लक्षात घेऊन शासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.