एन.एस.एस, सांस्कृतिक समिती व कॉमर्स विभागातर्फे आयोजन.
प्रतिनिधी स्वाती गायकवाड| रिसोड
5 सप्टेंबर रोजी स्थानिक उत्तमचंद बगडिया महाविद्यालयाच्या एन एस एस व कनिष्ठ विभागाच्या वतीने शिक्षक दिन अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी असलेला आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी विद्यार्थ्याद्वारे अनेक मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यश नखाते व ज्ञानेश्वर ढाकणे या विद्यार्थ्यांनी शिक्षकांवर कविता सादर केल्या. विद्यार्थी महेश सानप व सुशांत लोखंडे यांनी आपल्या मनोगतातून ' शिक्षकांचे महत्त्व'या विषयावर विविध उदाहरणे देऊन अत्यंत प्रभावी विचार मांडले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले प्रा.डॉ.नंदेश्वर, डॉ. वानखेडे,प्रा. डॉ.खेडेकर, प्रा.डॉ.बुधवंत, प्रा.डॉ. टिकार, डॉ.मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे व अमूल्य मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी होते. अध्यक्षीय भाषणात बोलताना ते म्हणाले की "आई वडील आपल्याला जन्म देतात मात्र शिक्षक आपल्या आयुष्याला आकार देतात, त्यामुळे अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार होतात".
हा संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. मंगला खेडेकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि कनिष्ठ विभागाचे प्रा. संदीप पाटील जुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. विद्यार्थ्यांच्या या सुंदर उपक्रमाचे आणि उत्कृष्ट आयोजना बद्दल प्राचार्य कुलकर्णी सर यांनी व सर्व शिक्षकांनी कौतुक केले व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री उत्तमचंदजी बगडिया साहेब व संस्थेचे सचिव श्री विठ्ठलराव वसु साहेब यांनी एनएसएस विभाग व कनिष्ठ महाविद्यालय विभाग यांचे व सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापिका श्वेता बोंडे मॅडम तसेच विद्यार्थी गोपाल सोनूने, विश्वनाथ लाड, ओम दाढे, शैलेश डिंडरकर, गौरव पांढरे, सोनाली अंभोरे, ऋतुजा कालापाड, राजेश्वरी कुबडे, गौरी भांदुर्गे, अनिकेत खरात, नम्रता बेंबळकर, कार्तिक हेंबाडे, पांडुरंग बाजड यांनी विशेष परिश्रम घेऊन मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली मगर तर आभार आरजू दळवी या विद्यार्थिनीने केले. प्रगती मगर, अंजली पुंड, अजेश चव्हाण, कपिल नवले यांनी शिक्षकांविषयी भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाला प्रा. डॉ. मनवर, प्रा.डॉ. नरवाडे, प्रा.डॉ. काळे, प्रा. डॉ. वानरे,प्रा. जाधव, प्रा. गाडेकर,प्रा.प्रजापती,प्रा. संदीप जुनघरे,प्रा. राम जुनघरे,प्रा. पांढरे, प्रा. विनोद राऊत, प्रा. पाठक,प्रा. बाजड, प्रा. बोंडे, प्रा. वाघ, प्रा. सुमित लाव्हरे सर तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
