वाशीम: प्रतिनिधी
आज, गुरुवार दिनांक 20/08/2026 रोजी, नमाज-ए-ज़ोहरनंतर, मागील 7 वर्षांपासून कार्यरत खान ऑनलाइन सेंटर, नगर परिषद शाळेसमोर, मोईन किराणा दुकानाच्या बाजूला, वाशिम यांना महा ई-सेवा सेतू केंद्राची सुविधा प्राप्त झाल्याच्या निमित्ताने उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनाब अल्हाज अन्सार अहमद खान साहेब, मंगरुळपीर हे होते.
उद्घाटक म्हणून वाशिम शहरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व मा. श्री अनिल माधवरावजी केंदळे साहेब, नगराध्यक्ष, वाशिम तसेच श्री बिरादार साहेब, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद वाशिम यांनी उपस्थिती लावली. त्यांनी केंद्राचे उद्घाटन करण्यासोबतच उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्हाज मास्टर मोहम्मद जाकीर साहेब बेलदार, मोहम्मद सिद्दीक अहमद साहेब, Senior IT Engineer (NIC), तसेच जनाब मुस्तफा भाई बागवान यांनी मोलाची भूमिका बजावली.
कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी वाशिम शहरातील उलमा-ए-इकराम, समाजसेवक, सोशल वर्कर्स, डॉक्टर्स, शिक्षक तसेच आमचे नगरसेवक जनाब गुलजार अहमद भाई, जनाब साबीर मिर्झा भाई, जनाब सद्दाम भाई, जनाब नूर भाई, श्री वानखेडे भाऊ आणि प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी व यशस्वीतेसाठी मोहम्मद तस्लीम बेलदार, मोहम्मद कलीम बेलदार, मुस्तकीम भाई उर्फ राजू ठेकेदार, मुजम्मिल ठेकेदार, दादुल्लाह ठेकेदार, असदुल्लाह खान, इनायतुल्लाह खान, बादुल्लाह खान, अमानुल्लाह खान, शेख मतीन भाई, शेख मुन्तज़िर, शेख यासिर अराफात, मोहम्मद सालिक, मोहम्मद फाजिल आणि मोहम्मद मुगीस यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. सर्वांच्या मेहनती आणि सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला.
महा ई-सेवा सेतू केंद्राचे संचालक प्रो. इबादुल्लाह खान जैदुल्लाह खान आहेत. या सेतू केंद्राच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 15 तसेच मुस्लिमबहुल भागातील नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या विविध सुविधा व सेवांचा लाभ सहज उपलब्ध होणार आहे.
या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना Affidavit, Domicile Certificate, Ration Card, Non-Creamy Layer Certificate, Caste Certificate, उत्पन्न दाखला (Income Certificate), रहिवासी दाखला (Residential Certificate), भूमिहीन दाखला तसेच इतर विविध सेवांचा लाभ घेणे अधिक सोयीचे होणार आहे.
मुस्लिमबहुल भागातील नागरिकांसाठी ही निश्चितच मोठी आनंदाची आणि सुविधेची बाब आहे. आता शासकीय सेवांसाठी नागरिकांना अनावश्यक त्रास आणि धावपळ कमी होऊन मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
या सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधा:
महा ई-सेवा सेतू केंद्र
नगर परिषद शाळेसमोर,
मोईन किराणा दुकानाच्या बाजूला, कसाबपुरा, वाशिम
प्रो. इबादुल्लाह खान जैदुल्लाह खान
📞 मो.: 8208607421
