बापाचे छत्र हरविलेल्या अनाथ मुलींना देशमुख कुटुंबीयांचा माणुसकीचा आधार.

 दोन मुलींना १ लाखांची आर्थिक मदत; बारावीपर्यंतच्या शिक्षणाची व रिसोड येथील निवासाची जबाबदारी घेण्याचा शब्द.

प्रतिनिधी : स्वाती गायकवाड
मांगुळ झनक : लोकनेते, माजी खासदार तथा माजी मंत्री अनंतराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा नेते अॅड. नकुलदादा देशमुख व भाजपा नेत्या सौ. अमृताताई देशमुख यांनी मांगुळ झनक येथील वीज पडून वडिलांचे छत्र हरविलेल्या दोन मुलींना तब्बल १ लाख रुपयांची आर्थिक मदत देत माणुसकीचा आधार दिला.
काही दिवसांपूर्वी वीज पडून स्व. गजानन सुरुशे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात राहिलेल्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची तसेच भविष्यातील संगोपनाची जबाबदारी लक्षात घेऊन देशमुख कुटुंबीयांनी मदतीचा हात पुढे केला. यावेळी भाऊसाहेब देशमुख, दादासाहेब देशमुख व सौ. अमृताताई देशमुख यांनी दोन्ही मुलींचे इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण तसेच रिसोड येथे राहण्याची व्यवस्था स्वतः करण्याचा शब्द दिला.
याचप्रसंगी वीज पडून जखमी झालेले विशाल नंदकिशोर लेमाडे यांनाही आर्थिक मदत देऊन त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यात आला.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मांगुळ झनक येथील शेतकरी श्री. गजानन खिल्लारी यांच्या सोयाबीनच्या सुडीला आग लागून मोठे नुकसान झाले होते. त्यावेळीही अॅड. नकुलदादा देशमुख व सौ. अमृताताई देशमुख यांनी पुढाकार घेत श्री. खिल्लारी यांना आर्थिक मदत केली होती.
यावेळी सभापती सुभाषराव खरात, जि. प. सदस्य प्रभाकरराव तहकीक, भाजपा नेते डॉ. भाग्यवंत साहेब, पंचायत समिती सदस्य भूषण दांदडे, केशवरावजी बाजड, सरपंच पंजाबरावजी घोटे, सतीशजी झनक, दत्तरावजी दांदडे, राजुभाऊ जोशी, अनिलभाऊ कोरडे, सतीषभाऊ काळे, संजयजी दांदडे, रामकिसानजी घोटे, विठ्ठलभाऊ घोटे, रामुजी काळे, विनोदजी दांदडे, मनोजभाऊ अनसिंगकर, गणेशभाऊ भांदुर्गे, नितीनभाऊ देशमुख, रामभाऊ जाधव यांच्यासह अॅड. नकुलदादा देशमुख मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संकटाच्या काळात गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून दुःखितांना आधार देणे आणि माणुसकीची ज्योत तेवत ठेवणे, हे देशमुख कुटुंबीयांचे कार्य समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
थोडे नवीन जरा जुने