CET पोर्टलवरील महाविद्यालये व निकाल प्रक्रियेविरोधात जगदीश मानवतकरांचा आंदोलनाचा इशारा.
वार्ता :: १० ऑगस्ट:संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर येथे जगदीश मानवतकर यांची अभिजीत दिपके यांच्याशी भेट घेतली व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाचा इशारा दिला .
सवितार वृत्त असे की , LL.B. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. CET प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयांच्या उपलब्धतेबाबत निर्माण झालेला संभ्रम तसेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा, पेपर तपासणी व निकाल प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांकडून करण्यात येत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
CET पोर्टलवरील LL.B. प्रवेश प्रक्रियेत मोठ्या संख्येने २०० महाविद्यालये उपलब्ध नसल्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित यंत्रणांनी महाविद्यालयांच्या स्थितीबाबत स्पष्टता करून पात्र महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पेपर फेर तपासणी व निकाल प्रक्रियेबाबतही विद्यार्थ्यांकडून तक्रारी करण्यात येत आहेत. काही विद्यार्थ्यांनी फेरतपासणीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांच्या गुणांमध्ये वाढ होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी व निकाल प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची योग्य पद्धतीने तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच विद्यापीठाकडून शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क आणि फेरतपासणी शुल्कात वाढ करण्यात आल्याने विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे सांगण्यात आले. शुल्कवाढीचा पुनर्विचार करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या विविध विद्यार्थी प्रश्नांसंदर्भात कोकरोज जनता पार्टीचे महाराष्ट्र समर्थक जगदीश मानवतकर यांनी संभाजीनगर येथे कोकरोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी LL.B. विद्यार्थ्यांच्या समस्या शासन, CET प्रशासन तसेच संबंधित विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी अभिजीत दिपके यांनी “विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असे आश्वासन दिल्याचे जगदीश मानवतकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या LL.B. LLM प्रवेशाचा प्रश्न, परीक्षा व पेपर तपासणीतील कथित त्रुटी, फेरतपासणीनंतर गुणांमध्ये होणारी वाढ तसेच शुल्कवाढ या प्रश्नांवर संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर योग्य तो निर्णय न झाल्यास लवकरच मोर्चा अथवा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जगदीश मानवतकर यांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
या चर्चेदरम्यान विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत जगदीश मानवतकर, पवन मानवतकर, ॲड. राम हनवते, महादेव भोंगळ, सौ. रुपाली जामणिक, अशोक हिवाळे, रामदास कालापाड, रवी ठोके, महादेव आवारे, विवेक मानकीकर, अमोल भटकर, सौ. स्मिता वानखेडे, शे. रेहान, गौरव किटकुले, नीलकंठ डोंगरे, सौ. रुपाली शिरसाट, अक्षय हिवराळे, सौ. संध्या सरदार, जगदीश पातुर्डे, संजय झरेकर, प्रो. सोळंके सर यांच्यासह विविध विधी महाविद्यालयांतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित या प्रश्नांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि प्रवेश व परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, अशी अपेक्षा उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.