“माणुसकी अजूनही जिवंत आहे! मांगुळ झनक येथील स्व. गजानन सुरेशे यांच्या कुटुंबाला ६९ हजारांची मदत”

दुःखाच्या प्रसंगी मदतीचा हात; हीच खरी माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी!

प्रतिनिधी: स्वाती गायकवाड 
मांगुळ झनक येथील स्व. गजानन सुरेशे यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले. या दुःखद प्रसंगी कुटुंबाला आधार देण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला.
आदर्श शिक्षक तथा मार्गदर्शक विनोद झनक सर यांच्या पुढाकारातून वाशीम जिल्ह्यातील त्यांचे संबंधित मित्रपरिवार तसेच अधिकारी वर्ग यांच्या सहकार्याने ६९ हजार रुपयांचा मदत निधी जमा करण्यात आला. हा संपूर्ण निधी आज गावकऱ्यांच्या वतीने स्व. गजानन सुरेशे यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त करण्यात आला.
या प्रसंगी गावकऱ्यांनी स्व. गजानन सुरेशे यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत, भविष्यातही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
या मदतकार्याबद्दल संपूर्ण मांगुळ झनक ग्रामस्थांच्या वतीने आदर्श शिक्षक व मार्गदर्शक विनोद झनक सर, तसेच वाशीम जिल्ह्यातील त्यांचे मित्रपरिवार आणि अधिकारी वर्ग यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
संकटाच्या काळात जात-पात, मतभेद बाजूला ठेवून माणुसकीच्या भावनेतून एकत्र येत गरजू कुटुंबाला आधार देण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे
थोडे नवीन जरा जुने