प्रतिनिधी स्वाती गायकवाड
वाशिम, दि. २१ : उपेक्षित, वंचित आणि शोषित समाजघटकांच्या न्याय्य हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लोकनेते, त्यागमूर्ती व लॉंग मार्चचे प्रणेते क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांच्या स्मृतिदिनानिमित्त वाशिम येथील बाबासाहेब गोपले भवन, क्रांतिवीर लहुजी नगर येथे शुक्रवारी अभिवादन कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बाबासाहेब गोपले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मातंग संघाचे राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागड यांनी बाबासाहेब गोपले यांच्या सामाजिक व संघर्षमय जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
वंचित समाजाला न्याय, हक्क आणि सन्मान मिळावा यासाठी बाबासाहेब गोपले यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, व्यसनाधीनता आणि सामाजिक विषमतेविरोधात त्यांनी जनजागृती व प्रबोधनाचे कार्य केले. समाजाने संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी संघर्ष करावा आणि शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी, हा त्यांच्या कार्याचा प्रमुख संदेश होता.
लॉंग मार्चच्या माध्यमातून त्यांनी वंचितांच्या प्रश्नांना शासनाच्या पातळीवर पोहोचवून सामाजिक न्यायासाठी संघर्षाची नवी दिशा निर्माण केली. त्यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा वारसा आजच्या पिढीने पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे संजय वैरागड यांनी सांगितले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक चंद्रभान पोळकर, अखिल भारतीय मातंग संघाचे विदर्भ अध्यक्ष माणिकराव बांगर, जिल्हाध्यक्ष आर. के. पाटोळे, प्रबोधनकार विलास भालेराव, लहुजी शक्ती सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य कैलासराव रणसिंगे, माजी सरपंच दामोदर इढोळे, भारत इढोळे, प्रकाश इढोळे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेब गोपले यांच्या सामाजिक संघर्षाचे स्मरण करून त्यांच्या विचारांना अभिवादन केले.