वाहकाच्या सहकार्यामुळे एसटी बस मध्ये हरवलेले २४ हजार रु.आजीला परत मिळाले.




वाशिम
वर्ष २०२४ मध्ये छत्रपती संभाजी नगर ते वाशिम अशी बस कामगिरी करत असताना चालक डी.एन.खोमणे तसेच त्या बसचे वाहक आर.बी. वाणी जेव्हा बस वाशिम बस स्थानकावर पोहोचली आणि बस मधून सर्व प्रवासी उतरून गेल्यानंतर त्या बसमध्ये वाहक राजू वाणी यांना एक पॉकेट दिसले आणि त्या पॉकेटमध्ये रक्कम रुपये २४ हजार होते, आणि एक चिठ्ठी होती,त्यामध्ये नाव होते कासाबाई गायकवाड, वाहक राजू वाणी यांच्या लक्षात आले की हे पैसे बस मध्ये पडले त्यांनी ती रक्कम ताब्यात घेऊन लगेच आगारांमध्ये जमा केली,
परंतु वाहक राजू वाणी एवढ्या वर न थांबता ते सतत त्या वयोवृद्ध आजीचा बस मध्ये शोध घेत होते.ते नेहमी वयोवृद्ध लोकांचे आधार कार्ड तपासत होते, आणि तब्बल १४ महिन्यानंतर शोध घेता घेता,त्यांना अखेर बस मध्येच मालेगाव ते वाशिम असा प्रवास करताना त्या आजी कासाबाई गायकवाड मिळाल्या. आणि लगेच राजू वाणी यांनी बस मध्ये आजीला विचारणा केली असता तुम्ही छत्रपती संभाजी नगर वरून वाशिम ला येत होत्या तेव्हा तुमचे पैसे हरवले होते का, तुम्ही जवळपास १४ महिन्या पूर्वी छत्रपती संभाजी नगर वरून वाशिम ला येत होत्या,आजीने लगेच उत्तर दिले हो,आम्ही दवाखान्यातून घरी परत येत होतो तेव्हा, माझे पैसे हरवले,आणि मग सुरुवात झाली आणि वाहक राजू वाणी यांना खात्री पटली की खरंच जे गहाळ झालेले २४००० रु.वाहक राजू वाणी यांनी जमा केले ते या आजीचेच होते.
आज अखेर तब्बल २ वर्षानंतर वयोवृद्ध आजीला बस मध्ये हरवलेले २४००० रु मिळाले,आणि आजीने आनंदअश्रुने समाधान व्यक्त करत बस वाहक राजू वाणी यांचे आभार मानले.वाशिम आगाराचे सहायक वाहतुक अधीक्षक,प्रशांत इंगोले,आजी कासाबाई गायकवाड,यांनी वाहक, राजु वाणी यांचा प्रामाणिकपणे बजावलेल्या कामगिरी बद्दल,जनमानसात आगाराचे नाव उज्ज्वल केल्या बद्दल आणि आजींना रक्कम मिळवुन देण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार गौरव करण्यात आला.
थोडे नवीन जरा जुने