बाभूळगाव आरोग्य उपकेंद्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.


बाभूळगाव, दि. १ ऑगस्ट : बाभूळगाव येथील आरोग्य उपकेंद्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी उपकेंद्राचे समुदाय विकास अधिकारी डॉ. बंडू चिखलकर, आरोग्य सेविका कामिनी कांबळे, आरोग्य सेवक दत्तात्रय गायकवाड, अटेंडंट दुर्पदाबाई वैरागडे तसेच आशा सेविका लक्ष्मी नागरे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य, संघर्षमय जीवनप्रवास आणि समाजप्रबोधनातील योगदानावर प्रकाश टाकला. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजात शिक्षण, समता आणि सामाजिक ऐक्याची भावना रुजविण्याचे आवाहन करण्यात आले.
शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
थोडे नवीन जरा जुने