प्रतिनिधी :
मांगुळ झनक :स्वाती गायकवाड :
लहु गर्जना ग्रुप व समस्त गावकरी मंडळी, मांगुळ झनक यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गावचे सरपंच मा. श्री प्रदीप घोटे व गावचे पोलीस पाटील मा. श्री कल्याणराव झनक यांच्या हस्ते लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे तसेच आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर उपस्थित मान्यवर दादाराव उत्तमराव वांझाळ पाटील, संतोष भूतडा, उत्तम काळे, अभिमानू घोटे, विनोद काळे, भूषण दांदाडे, विजय कोरडे, अतुल दांदाडे, बाळू चव्हाण, विठ्ठल घोटे, गणेश कोरडे, माधव घोटे, शेख शाहरुखभाई, वैजनाथ पातळे, शिवाजी महाराज अंभोरे, सौ. कमलबाई रामजी कांबळे व ओमभाऊ पंडितराव झनक या सर्व मान्यवरांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, मुक्ताबाई साळवे आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, समाजप्रबोधन व परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा समाजाने अंगीकार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास गावातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.व सकल मातंग समाज आणि लहु गर्जना ग्रुप सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लहु गर्जना ग्रुपचे सदस्य आकाशभाऊ केशव कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लहु गर्जना ग्रुपचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच समस्त गावकरी मंडळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

