वाशिम | प्रतिनिधी
विदर्भात मान्सून पुन्हा सक्रिय होत असून वाशिम जिल्ह्यात पुढील 24 तासांत काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामानातील बदलामुळे जिल्ह्यातील नदी-नाले, ओढे आणि सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामु
ळे विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, पूरग्रस्त किंवा पाण्याने भरलेल्या रस्त्यांवरून प्रवास करू नये तसेच विजेच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना :
हवामान खात्याच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवा.
नदी, नाले व पूरस्थिती असलेल्या भागांपासून दूर राहा.
शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा.
आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा.
दरम्यान, जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे.
