वाशिममध्ये छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त व्यसनमुक्ती जनजागृती दिंडी उत्साहात.

वाशिम | प्रतिनिधी
26-जून 2026
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत आज वाशिम शहरात व्यसनमुक्ती जनजागृती दिंडीचे आयोजन करण्यात आले. समाजात व्यसनमुक्तीबाबत जागृती निर्माण करणे आणि युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्याचा संदेश या दिंडीद्वारे देण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार निलेश पळसकर हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. प. म. मंगेश भुताडे यांनी व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जिल्हा परिषद वाशिमचे कल्याण अधिकारी, ज्योतिबा फुले व्यसनमुक्ती केंद्र, राजगाव (ता. जि. वाशिम) चे प्रकल्प अधिकारी सुधीर गावंडे तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.दिंडीत विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत व्यसनमुक्त भारताचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला.
थोडे नवीन जरा जुने