रिसोड | प्रतिनिधी
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत आज (दि. २८ जून २०२६) प्राथमिक आरोग्य केंद्र, मांगुळ झनक (ता. रिसोड, जि. वाशिम) येथे लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन रिसोड-मालेगाव मतदारसंघाचे आमदार मा. श्री. अमितभाऊ सुभाषराव झनक यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस पाजून करण्यात आले.
ही मोहीम वाशिम जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, उद्घाटन प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डाखोरे, प्राथमिक आरोग्य केंद्र मांगुळ झनकच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनल रुहाटिया, डॉ. पुरुषोत्तम मगर आणि डॉ. हरीश शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य सहाय्यक श्री. दिलीप चव्हाण, श्री. संतोष राऊत, आरोग्य सेवक श्री. आशिष इंगोले, आरोग्य सेविका श्रीमती कोमल खंदारे तसेच सर्व आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने परिसरातील पालकांना ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देऊन राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.
