Ad Code

मदर तेरेसा नर्सिंग कॉलेज आणि शाहू नर्सिंग कॉलेज च्या विध्यार्थ्यांचे धरणे आंदोलन.



वाशीम प्रतिनिधी :
वाशीम येथील मदर टेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंग तसेच शाहू कॉलेज नर्सिंग च्या विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन उभारले आहे
विद्यार्थ्यांची मागणी आहे कि शासनाकडून मिळणारी स्कॉलरशिप सुद्धा कॉलेज घेते तसेच विद्यार्थ्यांकडून सुद्धा अतिरिक्त फि वसूल करण्यात येते. त्यामुळे कॉलेज कडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे
वाशिम मधील मनसे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी विद्यार्थ्यांच्या बाजूने ठामपणे उभे असून लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या पूर्ण करण्यात याव्या व कॉलेज प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी भूमिका मनसे कार्यकर्ते आकाश लोलप तसेच पदाधिकारी यांनी घेतली आहे.
कॉलेज प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या लक्षात घेऊन कोणती कार्यवाही करते याबाबत सर्वांचे लक्ष वेधले आहे नर्सिंगचे शिक्षण पूर्ण करून रुग्णसेवा करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या विध्यार्थ्यावर आज रस्त्यावर उतरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी ठाम मागणी विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान केली आहे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या