वाशिम तालुक्यापासून जवळ असलेल्या शिरसाळा येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अॅडोकेट श्री. गवळी उपस्थित होते. तसेच अंगणवाडी सेविका श्रीमती शारदा इंगोले, विशाखा पडघाण यांच्यासह गावातील अनेक महिला उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित महिलांना डिजिटल युगातील बदलांविषयी माहिती देण्यात आली. मोबाईल बँकिंग व्यवहार कसे करावेत, आर्थिक व्यवहार सुरक्षितपणे कसे हाताळावेत तसेच महिलांचे हक्क व अधिकार याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने अॅडोकेट श्री. गवळी यांनी महिलांना संबोधित करत समाजातील महिलांची भूमिका आणि सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी गावातील युवा कार्यकर्ते श्री. राम इंगोले आणि श्री. शाम इंगोले यांनीही ‘आजची नारी शक्ती’ या विषयावर महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये जागरूकता वाढून त्यांना डिजिटल व्यवहार व त्यांच्या हक्कांविषयी महत्त्वाची माहिती मिळाली.

0 टिप्पण्या