Ad Code

मांगुळ झनक या ठिकाणी लहु गर्जना ग्रुप मांगुळ झनक यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

 

 रिसोड प्रतिनिधी :गावातील मंडळी आणि सकल मातंग समाज यांच्या उपस्थितीत आई जगदंबा माता संस्थान या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.लहु गर्जना ग्रुप सदस्य

आकाशभाऊ कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्य समाजातील लोकांना सांगितली.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला. त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. समाजात अंधश्रद्धा, रूढी आणि भेदभाव यांचे मोठे वर्चस्व होते. अशा कठीण परिस्थितीतही सावित्रीबाईंनी आपल्या पती ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडली. 1848 साली त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्रीशिक्षणाच्या चळवळीला सुरुवात केली.

सावित्रीबाईंना समाजाकडून मोठा विरोध सहन करावा लागला. शाळेत जाताना लोक त्यांच्यावर दगड, चिखल आणि शेण फेकत असत. परंतु त्या सर्व अडचणींना न घाबरता त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. त्यांच्या धैर्यामुळे आणि चिकाटीमुळे हजारो मुलींना शिक्षण घेण्याची संधी मिळाली. त्यांनी समाजातील अस्पृश्यता, जातिभेद आणि स्त्री-पुरुष असमानता याविरोधातही आवाज उठवला.

सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या एक संवेदनशील कवयित्री आणि समाजसेविका देखील होत्या. त्यांनी आपल्या लेखनातून आणि कार्यातून स्त्रियांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. विधवा महिलांसाठी त्यांनी आश्रय आणि मदतीची व्यवस्था केली. अनाथ मुलांसाठीही त्यांनी मोठे कार्य केले.

1897 साली पुण्यात प्लेगची साथ पसरली असताना सावित्रीबाईंनी आजारी लोकांची सेवा करण्यासाठी स्वतःला झोकून दिले. रुग्णांना मदत करताना त्यांनाही या आजाराची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. समाजासाठी काम करताना त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या