Ad Code

वाशीम जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते पी. एस. खंदारे यांना मदतीची गरज,

                                                     

वाशिम प्रतिनिधी /आवाज महाराष्ट्राचा न्यूज 

वाशीम जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या वेशभूषेतून शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, शहर तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये समाजप्रबोधन करणारे सर्वपरिचित सामाजिक कार्यकर्ते पी. एस. खंदारे यांना अचानक दुर्धर आजाराने ग्रासले आहे.

समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि विषमता दूर करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केले आहे. मात्र सध्या त्यांना गंभीर आजाराशी झुंज द्यावी लागत असून त्यांच्या कुटुंबाकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. त्यांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च अपेक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

पी. एस. खंदारे हे दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वाशीम जिल्ह्यातील एकमेव सक्रिय कार्यकर्ते असून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, जिल्हा परिषद शाळा बचाव आंदोलन तसेच  अनेक आंदोलनात उल्लेखनीय कार्य केले आहे.

याशिवाय, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाचे अभ्यासक असून संविधान दिनानिमित्त त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना संविधानाच्या प्रतींचे वितरण केले आहे. जिल्ह्यात संविधान साक्षरता निर्माण करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे.

कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या वेशभूषेतून समाजप्रबोधन केल्यामुळे ते जिल्ह्यात “आधुनिक गाडगेबाबा” म्हणूनही परिचित आहेत. अशा हरहुन्नरी सामाजिक कार्यकर्त्यावर आज दुर्धर आजारामुळे मृत्यूशी झुंज देण्याची वेळ आली आहे.

म्हणूनच त्यांना जवळून ओळखणाऱ्या सर्वांनी “फुलाची पाकळी” म्हणून जरी मदत केली तरी त्यांच्या उपचारासाठी मोठा आधार मिळू शकतो आणि ते पुन्हा समाजकार्याच्या चळवळीत सक्रिय होऊ शकतात.

 समाजातील दानशूर व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनि होईल तेवढी मादक करावी  असे आव्हान आवाज महाराष्ट्राचा न्यूज च्या माध्यमातून करण्यात येत आहे . 

आर्थिक मदत पाठवण्यासाठी:

📞 फोनपे / मोबाईल नंबर:  7700067266

(गौतम सदाशिव खंदारे) 

समाजासाठी आयुष्य समर्पित केलेल्या या निःस्वार्थी कार्यकर्त्याला मदतीचा हात देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या