Ad Code

कासोद्यात रंगला भक्तीभावात जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज सोहळा...||

प्रतिनिधी :-एरंडोल

विवेक रा महाले

शब्दांची तव जादू किती

भासतो ज्ञानाचा परीस,

पंढरीच्या वारी मधूनी

उजळतो श्रद्धेचा कळस...||

 तालूक्यांतील पहिले तूकोबांचे भव्य मंदिर कासोद्यात साकारले*

तूकाराम बीजच्या मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा

कासोदा येथील कौतिक नगरात तुकोबांचे ५६फूट उंच असे भव्य मंदिर उभारले असुन तूकाराम बीजच्या मुहूर्तावर मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

येथील प्रभाग क्र.१ मधील कौतिक नगर येथे भाविकांनी लोकवर्गणीतून राष्ट्रसंत जगतगुरू तुकाराम महाराज यांचे सुंदर मंदिर उभारले आहे.तुकाराम बीज या पावन मुहूर्तावर मंदिरात श्री. जगतगुरू तुकाराम महाराज तसेच श्रीहरी विठ्ठल व माता रुख्मिणी यांच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अमळनेरचे कमलेश श्रीकृष्ण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संत तुकाराम महाराजांचे १०वे वंशज अशोक महाराज देहूकर आणि गोविंद महाराज वारसाडेकर यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.२१ जोडप्यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने पूजाविधी, होमहवन सह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

या मंदिर उभारणीसाठी कौतिक नगरमधील नागरिकांनी सामूहिक सहभाग घेतला.येथे उभारलेले तुकोबांचे हे मंदिर एरंडोल तालुक्यांतील पहिले तर जळगाव जिल्ह्यांतील दुसरे मंदिर असल्याचा आयोजकांनी दावा केला आहे.महाप्रसाद वाटपानंतर कार्यक्रमांची सांगता झाली आहे.

 प्राणप्रतिष्ठा विधीचे यजमान 

दत्तू भास्कर खैरनार, केशव नगराज खैरनार, भुषण सुभाष पाटील, राहुल भास्कर खैरनार, योगेश धनराज खैरनार, नितीन भिमराव पाटील, लोकेश वसंत खैरनार, संदीप विठ्ठल पाटील, योगेश सुधाकर पाटील, सुनिल माणिक पाटील, हिरामण चिंधु पाटील, सुरेश पितांबर क्षीरसागर, आनंदा हिलाल खैरनार, माधवराव धोंडू क्षीरसागर, अरुण पिरा न्हावी, अक्षय हिमत पाटील, महेंद्र किशोर पाटील आदी यजमान दांपत्यांच्या हस्ते विधी पार पडले.

गावक-यांनी जर ठरवले तर कोणते ही शुभ काम लिलया सुव्यवस्थित पार पडते,याचे चांगले उदाहरण म्हणजे कासोद्यातील कौतिक नगरात उभे राहिलेले जगत गुरु तूकोब्बांचे तालुक्यांतील हे पहिले मंदिर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या