आज दिनांक 7 मार्च 2026
राष्ट्रीय महामार्ग 161 वाशीम–अकोला - अकोल्याकडून वाशीमकडे येणारा विटांनी भरलेला ट्रक इराळा फाट्याजवळ पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक अकोल्यावरून भरधाव वेगाने वाशीमकडे येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने येरळा फाट्याजवळ ट्रक पलटी झाला. अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विटा पडल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्त्यावर पडलेल्या विटा हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. अचानक झालेल्या अपघातामुळे चालक घाबरलेला होता. त्याला तपासणीसाठी मालेगाव सामान्य रुग्णालय येथे नेण्यात आले.
दरम्यान,जिल्हा वाहतूक नियंत्रक विभागाने तत्परता दाखवत वाहतूक लवकर नियंत्रणात आणली, व विविध माध्यमाच्या सह्याने सूचना दिल्या आहेत की उन्हाळ्याच्या दिवसांत टायर लवकर गरम होऊन फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे वाहनाचे नियमित सर्व्हिसिंग करावे, टायरची हवा तपासावी, वेळेवर टायर बदलावे तसेच वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवावा, जेणेकरून अशा दुर्घटना टाळता येतील.

0 टिप्पण्या