आर्टी'चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांच्याकडून गौरव.
मुंबई, ता. ६ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत नाशिकच्या प्रेरणा कैलास खवळे हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देदीप्यमान यश संपादन केले आहे. या यशाबद्दल तिचे 'आर्टी'चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे व निबंधक इंदिरा अस्वार यांच्या वतीने तिच्या यशाचा गौरव करण्यात आला आहे.
ऑगस्ट २०२५ मध्ये ‘नागरी सेवा’ मुख्य परीक्षा घेण्यात आली होती, तर डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान मुलाखती पार पडल्या. या परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला असून या निकालात नाशिकच्या प्रेरणा खवळे हिने ९१३ वा रॅंक पटकावून प्रशासकीय सेवेत जाण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे.
आर्टी'चे पाठबळ
प्रेरणा ही मातंग समाजातील असून तिने मिळवलेले हे यश समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. अनुसूचित जातीतील, विशेषतः मातंग समाजातील उमेदवारांना यूपीएससी मुलाखतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई मार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. प्रेरणाला देखील या योजनेचा लाभ मिळाला, ज्यामुळे तिच्या मुलाखतीच्या तयारीतील आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत झाली.
कोट:
"अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत प्रेरणाने मिळवलेले यश हे तिच्या जिद्दीचे आणि कष्टाचे फळ आहे. आर्टीच्या माध्यमातून युपीएससीची तयारी करण्यासाठी उमेदवारांना दिल्ली येथील नामांकीत संस्थेत पाठवले जाते. तसेच मुलाखतीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना आर्टीकडून आर्थिक सहाय्य दिले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार होण्यास प्रोत्साहण मिळते,"

0 टिप्पण्या