Ticker

6/recent/ticker-posts 🔥 Breaking News | 🔔 Subscribe Awaj TV10 Marathi

Ad Code

मांगुळ झनक येथे वकृत्व संमेलन सोहळा संपन्न.

 

रिसोड प्रतिनिधी

१७ फेब्रुवारी२०२६

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या १४५ व्या पुण्यतिथीनिमित्त आणि हिंदवी स्वराज्य संस्थेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या येत्या १९ फेब्रुवारी तारखेच्या जयंती निमित्त आपण मांगुळ झनक या ठिकाणी वकृत्व संमेलन सोहळा १७ फेब्रुवारी २०२६रोजी लहू गर्जना ग्रुप मांगुळ झनक यांच्यावतीने आयोजित करण्यात आला .

आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे , छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, डॉ अण्णाभाऊ साठे, मुक्ताबाई साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन मां झनकचे पोलिस पाटील मा. श्री कल्याण झनक यांच्या हस्ते करण्यात आले, रिसोड मालेगांव मतदार संघाचे आमदार श्री अमितभाऊ सुभाषराव झनक काही कारणामुळे येणे झाले नाही म्हणुन त्यांच्या वतीने ओमभाऊ पंडित झनक , जिल्हा प्रमुख श्री महादेवराव ठाकरे , श्री दत्ताराव झनक,पंचायत समिती सदस्य भुषण दांदडे , दादाराव उत्तमराव वांझाळ पाटील उपसरपंच शेख फारुख, शालिक कुटे, रतन ठाकरे, गजानन झनक, वसंता मामा साबळे, गणेश काळे, ज्ञानेश्वर झनक, ज्ञानेश्वर बोरकर वडजी, भागवत बोरकर वडजी दिपक झनक, संदिप झनक, मनु झनक, गजानन लेमाडे , प्रेम जुनघरे दिपक रणशिंगे, केशव कांबळे,विनोद कांबळे , आणि मोठ्या प्रमाणात शिवकन्या आणि लहु कन्या ह्या उपस्थितीत होत्या गावातील इत्यादी मंडळी उपस्थितीत होती. त्याचं बरोबर सौ.पुनम दिपक रणशिंगे आणि सौ.पुजा पवन कांबळे यांनी सुत्रसंचलन केले आणि आभार प्रदर्शन हे पुजाताई पवन कांबळे यांनी व्यक्त केले. लहु गर्जना ग्रुप सदस्य ज्ञानेश्वर भगवान गायकवाड यांच्या वतीने आणि लहु गर्जना ग्रुप मांगुळ झनक यांच्या वतीने वकृत्व स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या ०३–१६ वर्ष पूर्ण वयोगटातील २१ विद्यार्थ्यांना मेडल आणि सन्मानचिन्ह कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते देऊन सर्वांचे आभार व्यक्त केले.



Post a Comment

0 Comments