Ad Code

जिल्हा क्रीडा संकुल ग्राउंड ला लागुन असलेल्या रस्त्यात नालीचे पाणी साचल्यामुळे परिसरातील लोक त्रस्त..


            स्वच्छतेअभावी दुर्गंधी; प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी.

प्रतिनिधी | वाशिम

वाशिम शहरातील क्रीडा संकुल च्या भिंतीलगत मागील कित्येक दिवसांपासून नालीतील सांडपाणी रस्त्यावर साचलेले आहे. नाल्याची नियमित साफसफाई न झाल्यामुळे हे सांडपाणी बाहेर येऊन मोठा डबका तयार झाला आहे.

साचलेल्या पाण्यात किडे निर्माण झाले असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. नगरपरिषदेने याकडे दुर्लक्ष केले आहे . आणि सामान्य जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. जवळच भगीरथी अभ्यासिका आहे.येथे विध्यार्थी आपले भविष्य घडविण्याचे स्वप्न रंगवत आहेत.परंतु या नाल्याच्या घाण पाण्यामुळे त्यांची प्रकृती बिघडू शकते. या भागात दररोज धावण्यासाठी व व्यायामासाठी येणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि खेळायला येणारे लहान मुले यांना यामुळे गंभीर धोका निर्माण होऊ शकतो .व वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता आहे.तसेच संसर्गजन्य आजार पसरू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाने तात्काळ या समस्येची दखल घेऊन नालेसफाई करावी व कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.


.
📄 आमचे Edition E-Paper PDF डाउनलोड करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या