वाशिम प्रतिनिधी
प्राथमिक आरोग्य केंद्र उकळीपेन येथ दि.४/०२/२०२६ रोजी एका लहान कार्यक्रमात आरोग्य सहाय्यक सहदेव उत्तमराव चंद्रशेखर यांनी घोषणा केली की, केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व २० खेड्यांतील क्षयरुग्णांना फेब्रुवारी २०२६ पासून पुढील सहा महिन्यांसाठी दत्तक घेण्यात येणार आहे.
सदर दत्तक योजनेत, रुग्णांना त्यांच्या दैनंदिन आहाराशिवाय अतिरिक्त प्रोटीनयुक्त पोषण आहाराचे डब्बे पुरवण्यात येणार आहेत.
चंद्रशेखर हे दरवर्षी कोणत्याही ना कोणत्याही सामाजिक उपक्रमात गोरगरीब जनतेला मदत करण्यासाठी स्वतःच्या पगाराचा १० वा हिस्सा खर्च करतात. कोविड-१९ काळात त्यांनी कोविडग्रस्तांना त्यांच्या घरगुती उपजीविकेसाठी मदत केली होती. या कार्यामुळे त्यांना राज्यस्तरीय अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरपंच संघटना, मदर टेरेसा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, जिल्हा गौरव पत्र, महाराष्ट्र राज्य युवा परिषद, संवेदना फाउंडेशन, मित्रपरिवार, स्वराज्य सेना, अन्सारी विकास चॅरिटेबल ट्रस्ट, नवोदय ट्रस्ट, हुसेनी सेना मुंबई इत्यादींचा समावेश आहे. तसेच, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती वाशिम यांनी देखील त्यांचा गौरव केला आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या मनवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी वसंत, आरोग्य सहाय्यिका आशाताई प्रधान, औषधी निर्माण अधिकारी सपना आढाव, उपकेंद्र आरोग्य सेवक प्रमोद नप्ते, सुनील सरकटे, आरोग्य सेविका अर्चना पोळकर, ज्ञानबा थोरात, कामिनी कांबळे, नेहा पडघन, परिचारक शुभम सुरदुसे, महादेव सुरुसे, गोटे भगत, आणि डाटाएन्ट्री ऑपरेटर शरद कावरखे उपस्थित होते.
चंद्रशेखर यांचे कार्य तळागाळातील गोरगरीब जनतेसाठी आरोग्यसेवा पुरविण्यात जिल्ह्यात एकमेव आणि गौरवस्पद मानले जात आहे.

Facebook
0 Comments