Ticker

6/recent/ticker-posts 🔥 Breaking News | 🔔 Subscribe Awaj TV10 Marathi

Ad Code

वाशिमचे माजी सहाय्यक पोलिस आयुक्त तुलशीराम नागरे यांचे निधन.



वाशिम: वाशिम जिल्ह्यातील बाभुळगाव येथील राहणारे माजी सहाय्यक पोलिस आयुक्त, तुलशीराम गणपत नागरे (७२) यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने पोलिस विभागात आणि स्थानिक समाजात शोककळा पसरली आहे.
मुंबई पोलिस दलात आपल्या कार्यकाळात नागरे यांनी अनेक संवेदनशील आणि आव्हानात्मक प्रकल्प यशस्वीपणे हाताळले. त्यांनी मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणांशी संबंधित विविध ऑपरेशन्समध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्यामुळे पोलिस विभागात त्यांना त्यांच्या कौशल्य आणि कर्तव्यनिष्ठेसाठी विशेष सन्मान मिळाला. त्यांच्या धैर्यशील नेतृत्वामुळे अनेक कठीण प्रसंग यशस्वीपणे पार पाडले गेले.
त्यांचे पश्चात पत्नी, मुली, जावय, तसेच इतर कुटुंबीय आहेत. त्यांच्या निधनाने कुटुंबासह त्यांच्या सहकाऱ्यांमध्येही शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंतिम संस्कारात संपूर्ण राज्य सन्मानाने बाभुळगाव, वाशिम येथे पोलिस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.
शोकसंतप्त कुटुंबास आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आम्ही शोकसंवेदना व्यक्त करतो.

Post a Comment

0 Comments