Ticker

6/recent/ticker-posts 🔥 Breaking News | 🔔 Subscribe Awaj TV10 Marathi

Ad Code

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; तीन खात्यांची जबाबदारी

 

मुंबई | प्रतिनिधी

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शनिवारी (३१ जानेवारी २०२६) मुंबईतील लोकभवन येथे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.

राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साक्षीने हा शपथविधी सोहळा पार पडला. शपथविधी अत्यंत अल्पावधीत पार पडला.

सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क (Excise), अल्पसंख्याक विकास (Minority Affairs) तसेच क्रीडा व युवक कल्याण (Sports and Youth Welfare) ही तीन महत्त्वाची खाती सोपविण्यात आली आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शपथविधीबाबत त्यांना कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. तसेच अजित पवार यांच्या इच्छेनुसार एनसीपी व एनसीपी (एसपी) यांचे पुनर्मिलन अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या. सुनेत्रा पवार यांनीही शुभेच्छांसाठी त्यांचे आभार मानले.

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आले असून एनसीपीच्या आमदार बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली. पुनर्मिलनाबाबत अंतिम घोषणा १२ फेब्रुवारीला होणार असल्याची माहितीही समोर येत आहे.

✍️ UBN Live News Desk

🎙️ आवाज महाराष्ट्राचा

Post a Comment

0 Comments