मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांनी मुंबईतील लोकभवन येथे पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभाला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील काही वरिष्ठ नेते उपस्थित होते.
मात्र, या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (SP) चे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच आमदार रोहित पवार हे उपस्थित नसल्याचे दिसून आले. पवार कुटुंबातील या प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, पक्ष एकत्रीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर हा शपथविधी झाल्याने राजकीय समीकरणांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शरद पवार यांनी यापूर्वी माध्यमांशी बोलताना शपथविधीबाबत पूर्वकल्पना नसल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे या घडामोडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्यातील आगामी राजकीय घडामोडींवर या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Facebook
0 Comments