Ticker

6/recent/ticker-posts 🔥 Breaking News | 🔔 Subscribe Awaj TV10 Marathi

Ad Code

स्व. किसनराव सदार विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन; शहीद दिन साजरा



खडकीसदार (प्रतिनिधी):

संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्व. किसनराव सदार विद्यालय, खडकीसडा येथे दिनांक ३० जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहीद दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांना मानवंदना देण्यात आली.

यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. ज्ञानेश्वर पाटील सदार (मुख्याध्यापक) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा आणि प्रेम या मूल्यांच्या आधारे देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या विचारांचा आदर्श प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे. आपणास मिळालेले स्वातंत्र्य हे अनेकांच्या त्याग आणि बलिदानातून प्राप्त झाले आहे, हे विसरून चालणार नाही.

मीठ सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन अशा विविध स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींचे योगदान सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी देशप्रेम, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जपत आदर्श नागरिक बनावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमास सरोजिनी नायडू यांच्या कार्याचा उल्लेख करत महिलांच्या सहभागाचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.

या प्रसंगी संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संभाजी सदार, शिक्षकवृंद तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाठोरे सर (स्काउट शिक्षक) यांनी केले तर आभार प्रदर्शन फुपाटे सर यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अशा प्रकारे विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी व शहीद दिन श्रद्धापूर्वक साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments