Ticker

6/recent/ticker-posts 🔥 Breaking News | 🔔 Subscribe Awaj TV10 Marathi

Ad Code

स्व. किसनराव सदार विद्यालयात कृतज्ञ दिन साजरा.


 खडकी सदार :प्रतिनिधी 

  खडकी सदार येथील स्व. किसनराव सदर विद्यालयामध्ये आज दिनांक 31 जानेवारी म्हणजेच कृतज्ञ दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव सर (मुख्याध्यापक) हे होते प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील सदार हे होते. प्रमुख उपस्थिती मध्ये सतीश वायाळ सर, प्रमोद बकाल सर, प्रदीप वाठोरे सर, श्रीराम फुपाटे सर ,खडसे सर ,मंगेश कोरडे ,माधव मार्कड इत्यादी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी कृतज्ञता याविषयी आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री डॉक्टर ज्ञानेश्वर सदार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपण आज यांनी निसर्गाचे धन्यवाद मानले पाहिजे आपल्याला निसर्गाने मानव शरीर प्रदान केले माणूस शरीराने विकलाग जरी असला तरी मनाने मजबूत पाहिजे असतो आज काही तरुण मला काही मिळाले नाही म्हणून आत्महत्या करतात कुणाचे प्रेम भंग झाले आत्महत्या करतात, नोकरी लागली नाही तर आत्महत्या करतात, आत्महत्या करण्यापेक्षा आपण आलेल्या वाईट परिस्थितीला तोंड देऊन चांगल्या दिवसाची वाट पहावी, जीवन हे सुंदर आहे, जीवन हे जगण्यासाठी आहे मरण्यासाठी नाही, जगणे आपल्या हातामध्ये आहे मृत्यू हा अटळ जरी असला तरी जीवन जगताना सर्व निसर्गाचे आपण धन्यवाद मानले पाहिजे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की. जगामध्ये काहीच अशक्य नाही फक्त आपल्या मनाची तयारी असावी लागते कष्ट करण्याची तयारी असावी लागते, मेहनत ही जीवनाची शिदोरी आहे, आपल्या कामामध्ये प्रामाणिकपणा असला तर नक्कीच आपल्याला एक दिवस यश मिळते. ते यश पाहण्यासाठी आपल्याला सातत्याने कष्ट करावे लागतात. असे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. अशाप्रकारे आमच्या विद्यालयामध्ये कृतज्ञ दिन साजरा करण्यात आला.



Post a Comment

0 Comments