शिक्षणाचा नवा पॅटर्न : लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त केंद्रीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा; लहु गर्जना ग्रुप, मांगुळ झनकचा स्तुत्य उपक्रम.

 

प्रतिनिधी : स्वाती गायकवाड
लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त मांगुळ झनक येथील लहु गर्जना ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजित करून जयंतीला सामाजिक व शैक्षणिक स्वरूप देण्यात आले. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या आवारात झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महापुरुषांच्या विचारांचा वारसा कृतीतून पुढे नेण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी, आत्मविश्वास वाढावा आणि सामान्य ज्ञान समृद्ध व्हावे, या हेतूने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात परीक्षेला मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला.
या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक झुंजारे तसेच सर, बाजड सर,राऊत सर, बोडखे सर, बोरकर सर, सावळे सर आणि गवई सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षकवृंद, लहु गर्जना ग्रुपचे सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या या केंद्रीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी लहु गर्जना ग्रुपच्या या उपक्रमाचे स्वागत केले. अशा विधायक उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

थोडे नवीन जरा जुने