अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करा आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांचे आवाहन.
अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करा.
UBN News नेटवर्क:
मुंबई, दि. ३ : महाराष्ट्र शासनाच्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई यांच्या वतीने अनुसूचित जातीतील मातंग व तत्सम प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी. अधिछात्रवृत्ती (Ph.D. Fellowship) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी पात्र संशोधक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
आर्टीमार्फत “अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (ASNRF)” योजना राबविण्यात येत असून पात्र विद्यार्थ्यांना कनिष्ठ संशोधन अधिछात्रवृत्ती (JRF) दरमहा ३७ हजार रुपये तर वरिष्ठ संशोधन अधिछात्रवृत्ती (SRF) दरमहा ४२ हजार रुपये देण्यात येणार आहेत.
पीएच.डी.साठी दिनांक १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत कायम नोंदणी झालेल्या पात्र विद्यार्थ्यांनी दि. ४ ऑगस्ट २०२६ ते ३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावेत.
अधिक माहितीसाठी:
www.arti.org.in
ऑनलाईन अर्ज:
fellowship.trti-maha.in
UBN जनप्रहार न्यूज
