UBN न्यूज नेटवर्क
| दि. 30 मार्च 2026
अकोला–पूर्णा पॅसेंजर रेल्वेसमोर एक व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर झोपल्याची धक्कादायक घटना आज दुपारी सुमारे 3.00 वाजताच्या सुमारास घडली. संबंधित रेल्वेची नियोजित वेळ दुपारी 2.20 वाजताची असल्याची माहिती मिळाली आहे.
वेळीच लोको पायलटने सतर्कता दाखवत ट्रेन थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. संबंधित व्यक्ती ट्रॅकच्या मधोमध असल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला. मात्र या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. सध्या तो जिवंत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
घटनेनंतर तत्काळ त्या व्यक्तीला शिवणी रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले असून त्याच्यावर तातडीने वैद्यकीय उपचारासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.


0 टिप्पण्या