Ad Code

रिठद येथे अमृता पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा-"मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम…”

पॅनिक न होता जनतेने शांततेने या प्रसंगाशी समोरे जावे अशी प्रशांसनाने केले आव्हान.

वाशीम, प्रतिनिधी:पुरुषोत्तम इंगोले 

वाशीम जिल्ह्यातील रिठद येथील अमृता पेट्रोल पंपावर काल रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याच्या अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात इंधन भरण्यासाठी गर्दी करत आहेत.

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम भारतातही जाणवत असल्याचे वातावरण तयार झाले आहे. विशेषतः सध्या शेती हंगाम सुरू असल्यामुळे ट्रॅक्टरसाठी डिझेलची मागणी वाढली आहे. त्यामुळे पंपावर अचानक मोठी गर्दी होत आहे.

मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा नियमित सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

काही नागरिकांकडून गरजेपेक्षा जास्त प्रमाणात इंधन साठवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही समोर आले आहे. यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होत असून परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या