डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने राज्यातील समतादूत व प्रकल्प अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दि. 19 व 20 जानेवारी 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड (जि. रायगड) येथे संपन्न झाली आहे.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी प्रसार-प्रचार करणे, समतादूत व प्रकल्प अधिकाऱ्यांचे ज्ञान, कौशल्य आणि कार्यक्षमता वाढवणे हा आहे. राज्यभरातून उपस्थित राहणाऱ्या समतादूतांना दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या सत्याग्रह स्थळास भेट दिली असून, या ऐतिहासिक स्थळाचे मार्गदर्शन डॉ. बबन जोगदंड यांनी केले.
कार्यक्रमाबाबतची माहिती डॉ. निकास आत्रावते (मुंबई), प्रा. टी. आर. कोनेवाड (पुणे) तसेच समतादूत प्रकल्पाचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी दिली.
कार्यशाळेदरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी, तसेच समतावादी विचारधारेतील महान व्यक्तींच्या विचारांचा प्रसार करण्यात आला.
दि. 20 जानेवारी 2026 रोजी संविधानिक मूल्यांचा प्रसार, समतादूतांची भूमिका, तसेच “संविधान जनजागृती अभियान संपूर्ण राज्यात प्रभावीपणे कसे राबवावे” या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये सुमेध थोरात व इतर तज्ज्ञ मार्गदर्शन केले.
या दोन दिवसीय कार्यशाळे अंतर्गत विविध व्याख्याने, चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम व एकपात्री प्रयोग सादर करण्यात आले.
दि. 19 जानेवारी रोजी सायंकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांचा संवाद झाला.. तसेच “मी तुमची सावित्री” हा एकपात्री प्रयोग सादर केले.
कार्यशाळेचा समारोप दि. 20 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 ला समारोप झाला.

Facebook
0 Comments