Ticker

6/recent/ticker-posts 🔥 Breaking News | 🔔 Subscribe Awaj TV10 Marathi

Ad Code

विधानसभा पराभवातून उभारी, कैलास गोरंट्याल यांचे जालन्यावर पुन्हा वर्चस्व सिद्ध, मनपावर कमळ



 प्रतिनिधी - देवेंद्र गवळी: जालना : 

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपात दाखल झालेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी महानगरपालिकेचा गड राखण्यात यश मिळविले आहे. शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत भाजपने ४१ जागांसह बहुमतात महापालिकेवर सत्ता मिळविली आहे. या निवडणुकीत शिंदेसेना बॅकफूटवर गेली असून, दोन्ही राष्ट्रवादीचा सुपडासाफ झाला आहे.


महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक झाली. या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महायुती व्हावी यासाठी भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादीच्या (अजित पवार) नेत्यांच्या बैठकांवर बैठका झाल्या होत्या. परंतु, ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय झाला, तर महायुतीची मोट कायम होती. भाजपकडून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल, महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी सूत्रे हलविली. शिंदेसेनेकडून आमदार अर्जुन खोतकर यांनी सूत्रे हाती घेतली होती. महाविकास आघाडीची धुरा खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या खांद्यावर होती. जालना महानगरपालिकेच्या १६ प्रभागांतील ६५ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले. त्यात ६१.१६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर शुक्रवारी (दि.१६) सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. भाजपने अखेरपर्यंत आघाडी कायम राखत ४१ जागांवर विजय मिळविला, तर शिंदेसेनेला १२ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला नऊ, गोरंट्याल यांच्यामुळे मिळाले बळकाँग्रेस पक्षाचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारीही भाजपात आले होते. त्यामुळे भाजपची शहरातील ताकद वाढली होती. परिणामी गत नगरपालिका निवडणुकीत ११ असलेले भाजपचे संख्याबळ आता महानगरपालिकेत थेट ४१ वर आणि तेही बहुमतात आले आहे.

भाजपचे बळ वाढलेविधानसभा निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले होते. तर शिंदेसेनेचे दोन उमेदवार विजयी झाले होते. या निवडणुकीनंतर काँग्रेसचे नेते कैलास गोरंट्याल भाजपात दाखल झाले. परिणामी मनपा निवडणुकीत प्रथमच भाजपाला सत्ता मिळाली.


दोन्ही राष्ट्रवादी बाहेरजालना नगरपालिकेत राष्ट्रवादीचे नऊ उमेदवार होते. पक्ष फुटीनंतर झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीने निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. परंतु, त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर शुक्रवारी (दि.१६) सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. भाजपने अखेरपर्यंत आघाडी कायम राखत ४१ जागांवर विजय मिळविला, तर शिंदेसेनेला १२ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला नऊ, एमआयएमला दोन आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाला.

Post a Comment

0 Comments