स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; दामू इंगोले, हर्षद पारे यांचा शासनाला इशारा.
कारंजा (वाशिम) : कारंजा तालुक्यात मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. पावसाअभावी सोयाबीनसह विविध पिकांचे मोठे नुकसान होत असून परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले आणि हर्षद पारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पावसाअभावी पिकांची अवस्था गंभीर झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
यावेळी दामू इंगोले यांनी सांगितले की, मागील महिनाभरापासून पाऊस नसल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस निर्णय घ्यावा.
दरम्यान, परिसरातील एका गावात शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचाही उल्लेख आंदोलकांनी केला. “आणखी शेतकऱ्यांवर अशी वेळ येऊ नये,” अशी भावना व्यक्त करत शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी प्रतिकात्मक स्वरूपात स्वतःला काळ्या आईच्या मातीत गाडून घेत आंदोलन केले. शेतकऱ्यांची परिस्थिती किती गंभीर झाली आहे, हे शासनाने लक्षात घ्यावे, असे आंदोलकांनी म्हटले.
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शासनाला देण्यात आला.