Top News

राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्काराने’ विनोद झनक यांचा गौरव

प्रतिनिधी : स्वाती गायकवाड
मांगुळ झनक : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत मांगुळ झनक येथील शिक्षक श्री. विनोद झनक सर यांना प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय ‘आयडियल शिक्षक पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.
वाशिम येथील स्वर्गीय वसंतराव नाईक सभागृह, जिल्हा परिषद येथे आयोजित विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री नामदार श्री. दादासाहेब भुसे यांच्या हस्ते विनोद झनक सरांचा विशेष गौरव करण्यात आला.
विनोद झनक सरांनी शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे मांगुळ झनक परिसरासह संपूर्ण वाशिम जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सन्मान सोहळ्यास मा. खासदार श्री. संजयभाऊ देशमुख, मा. आमदार श्री. अमितभाऊ झनक, मा. आमदार श्रीमती भावनाताई गवळी, मा. आमदार श्री. किरणभाऊ सरनाईक, मा. आमदार श्री. लिंगाडे साहेब, मा. आमदार श्री. श्यामभाऊ खोडे, मा. आमदार सई ताई डहाके, वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अर्पित चव्हाण साहेब यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
विनोद झनक सरांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिक्षण क्षेत्रातील सहकारी, विद्यार्थी, पालक तसेच मांगुळ झनक येथील ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या राज्यस्तरीय सन्मानामुळे परिसरातील शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी नवी ऊर्जा निर्माण झाली आहे.
थोडे नवीन जरा जुने