तालुक्यातील आदिवासी गावांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने फुफाटे बंधूंनी एक आदर्श उपक्रम राबवत अभ्यासिका व ग्रंथालय सुरू केले आहे. या उपक्रमामुळे समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
रिसोड तालुक्यातील कुन्हा परिसरातील रहिवासी तसेच शिवाजी विद्यालय, रिसोड येथील सेवानिवृत्त प्रयोगशाळा परिचर स्व. सुखाराम सोनाजी फुफाटे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलांनी — भगवान फुफाटे व प्रीराम फुफाटे यांनी आपल्या गावात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालयाची उभारणी केली आहे.
या अभ्यासिकेत विविध शैक्षणिक पुस्तके तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.
स्व. सुखाराम फुफाटे हे आपल्या सेवाकाळात गरजू विद्यार्थ्यांना नेहमी मदत करत असत. त्यांचाच वारसा जपत त्यांच्या मुलांनी हा उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.
या अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. समाजातील तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.
UBN न्यूज नेटवर्क.

0 टिप्पण्या