वाशिम :प्रतिनिधी.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय वाशिम अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक मा. डॉ. अनिल कावरखे अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी व वाशिम पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक मा. चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १३.०२.२०२६ रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, मराठवाडा ग्रामिण विकास संस्था, छत्रपती संभाजी नगर व वाशिम पोलीस स्टेशन (शहरी) यांच्या संयुक्त विद्यमाने कोटपा २००३ च्या कायदयाअंतर्गत कलम ६ (अ), ६ (ब) चे उल्लंघन करणारे १८ पानटपरीधारकांवर दंडात्मक कारवाई करून ३६०० रु दंड वसुल करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, पाटणी चौक, रीसोड नाका, या ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये जिल्हा रुग्णालय, वाशिम येथील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. आदित्य पांढारकर, मानसशास्त्रज्ञ श्री. राम सरकटे, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे, म.ग्रा. वि.सं.चे जिल्हा समन्वयक श्री. मंगेश गायकवाड. पोलीस स्टेशन (शहरी) विभागाचे पो.कॉ. व गृह रक्षक दलाचे समादेशक यांचा सहभाग होता.

Facebook
0 Comments