प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून समुदाय आरोग्आय अधिकारी बंडू चिखलकर , रोग्य सेविका सौ. कामिनी कांबळे, आरोग्य सेवक देवेंद्र ताजने यांनी जिल्हा परिषद शाळा, बाभूळगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित सिकलसेल आजार बाबत जनजागृती केली . व अरुणोदय सिकलसेल अनेमिया विशेष मोहीम बाबत जनजागृती केली. या कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवृंद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सदर आरोग्य कर्मचारी यांनी सिकलसेल तपासणी बाबत आव्हाहन केले. तसेच सिकलसेल तपासणी चे महत्व विषद केले त्याची लक्षणे काय असतात न उपौयोजना काय केल्या पाहिजे. तपासण्या कोणत्या असतात या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग व मानसिक आरोग्याचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी अंगीकारल्यास अनेक आजारांपासून बचाव करता येतो, असे त्यांनी सांगितले.
तसेच शासनाच्या सिकलसेल निर्मूलन मोहिमेबाबत विद्यार्थ्यांना माहिती देत असताना . सिकलसेल हा एक आनुवंशिक रक्ताचा आजार असून त्याची लक्षणे जसे की सतत थकवा, शरीरात वेदना, वारंवार ताप येणे, रक्तक्षय याबाबत जनजागृती करण्यात आली. या आजारावर वेळेवर तपासणी, योग्य उपचार, पौष्टिक आहार आणि नियमित वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले असता, आरोग्य सेविका कामिनी आवारे यांनी त्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी या उपक्रमाचे कौतुक करत, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आरोग्य व सिकलसेलसारख्या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असे मत व्यक्त केले.

Facebook
0 Comments