प्रतिनिधी :-विवेक आर महाले एरंडोल
कासोदा तालुका एरंडोल येथील पाच तरुणांना नेहमी होणाऱ्या छेडखानीला कंटाळून आडगाव येथील 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केली होती.
यासंदर्भात कासोदा येथील पाच तरुणांना अटक करून जळगाव येथील विशेष कोर्टात हजर केले अस्ता त्यांना 5 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुरू करण्यात आली आहे.
आडगाव येथील तरुणीने आत्महत्या केल्याची घटना 26 सप्टेंबरला घडली होती. याबाबत संशयीत आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महेश विठ्ठल मराठे (वय 21) अभिषेक सुनील उशिरे (वय 21) रोहित महेंद्र मोरे (वय 21) मनोज रामभाऊ गडरी (वय 21) आणि रुपेश आनंदा वारे (वय 21) यांच्यावर कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्या सर्व तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.दरम्यान ही तरुणी एरंडोल येथील महाविद्यालयात कला शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती 26 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या तरुणाचे आई-वडील शेतातून घरी परत आल्यावर हा प्रकार लक्षात आला.
दरम्यान गेल्या काही दिवसापासून विविध तरुणीला हे संशयित त्रास देत होते असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विजय ठाकूर वाड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील व पोलीस कर्मचारी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा