एरंडोल | प्रतिनिधी – विवेक आर. महाले
नाशिक येथील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने योगदान देणारे भाऊसाहेब उत्तमराव पाटील यांना यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. भाऊसाहेब पाटील हे एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी असून, त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान तसेच विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ यामुळे त्यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या कार्याची योग्य पावती मानली जात आहे.
पुरस्कार मिळाल्यानंतर मित्रपरिवार, हितचिंतक तसेच विविध स्तरांतून भाऊसाहेब पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. “प्रिय मित्रा, तुला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मनापासून अभिनंदन! विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तू घेत असलेले कष्ट आणि शिक्षण क्षेत्रात देत असलेले योगदान निश्चितच कौतुकास्पद आहे. तुझा हा यशस्वी प्रवास असाच सुरू राहो आणि भविष्यात तुला आणखी मोठे यश व सन्मान मिळो,” अशा शब्दांत मित्रपरिवार व हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले.
या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून, आगामी काळातही भाऊसाहेब पाटील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा