Top News

उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात श्री चक्रधर स्वामी जयंती उत्साहात साजरी.


प्रतिनिधी: स्वाती गायकवाड 

*रिसोड : येथील उत्तमचंद बगडिया कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख, एन.एस.एस. प्रमुख तथा सांस्कृतिक समितीप्रमुख प्रा. डॉ. खेडेकर मॅडम यांनी केले. त्यांनी मराठी विभागाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना श्री चक्रधर स्वामी यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महानुभाव संप्रदायाचे अभ्यासक प्रा. अमर साबळे उपस्थित होते. त्यांनी श्री चक्रधर स्वामी यांचे जीवन, तत्त्वज्ञान तसेच लीळाचरित्र या ग्रंथाचे ऐतिहासिक व साहित्यिक महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. महानुभाव पंथाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या विकासाला मिळालेल्या चालनेवरही त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांनी श्री चक्रधर स्वामी यांच्या समता, अहिंसा, मानवता आणि सामाजिक समरसतेच्या विचारांचा स्वीकार करून ते आचरणात आणण्याचे आवाहन केले. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या मनात संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास प्रा. टिकार, प्रा. डॉ. बुधवंत, प्रा. डॉ. वानखेडे, प्रा. डॉ. नंदेश्वर, प्रा. राऊत, प्रा. राम जुनघरे, प्रा. बाजड, प्रा. वाघ, प्रा. पाठक मॅडम, प्रा. बांडे मॅडम, श्री ओंकार पुरी, डॉ. नरवाडे, डॉ. काळे मॅडम, डॉ. मनवर, प्रा. वानरे मॅडम, प्रा. जाधव यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. गाडेकर, प्रा. सोळंकी, प्रा. प्रजापती, श्रीमती नरवाडे यांच्यासह सहकाऱ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रा. संदीप जुनघरे तर आभार प्रदर्शन प्रा. सुमित लाव्हरे यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने