दिवाणी न्यायाधीशांसह विधी तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन.
रिसोड | प्रतिनिधी
रिसोड येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयात तालुका विधी सेवा समिती, रिसोड यांच्या वतीने ‘सुरक्षित बचपन अभियान’ अंतर्गत बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो कायदा) याबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना बालकांचे अधिकार, त्यांचे संरक्षण आणि कायद्याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिसोड येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तराचे श्री. पी. व्ही. सपकाळ हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याची माहिती देत बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींबाबत मार्गदर्शन केले.
अॅड. श्री. डी. व्ही. महाजन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत बालकांचे अधिकार आणि त्यांच्या संरक्षणाचे महत्त्व विशद केले. तसेच अॅड. श्री. एस. पी. इरतकर यांनी बालकांच्या संरक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर मगर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक श्री. माधव मुंढे यांनी केले.
कार्यक्रमाला न्यायालयातील वरिष्ठ लिपिक श्री. नारायण भोयर, श्री. कमल झोरे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बालकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि कायद्याविषयी माहिती पोहोचवणे, हा या जनजागृती कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

टिप्पणी पोस्ट करा