वाशिम: वाशिमच्या मालेगांव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील माहेर असलेल्या 35 वर्षीय विवाहित मुलीचा तिच्या पतीच्या मित्रासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून वडिलांनी खून करून तिचा अंत्यसंस्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ब्राह्मणवाडा येथील संतोष गोटे यांच्या मुलीचा 2016 मध्ये हिंगोली जिल्ह्यात विवाह झाला होता. पती पत्नीचा संसार सुरळीत असताना त्यांना दोन मुलेही झाली होती. दरम्यान मागील एक ते दीड वर्षापासून मुलीच्या नवऱ्याच्या मित्रासोबत तिचे प्रेम संबंध जुळले, याची माहिती तिच्या पतीने सासरे संतोष गोटे यांना दिली. मागील काही दिवसापूर्वी ती पळून गेली होती, तिला शोधून घरी आणले पण दसऱ्याच्या दिवशी पुन्हा ती पळून गेली व पुन्हा घरी आणले.
वडिलांने रागाच्या भरात या मुलीची गळा घोटून हत्या केली आणि आपल्याच शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले अशी महिती मिळावी.पोलिसांना गुप्त सूत्रांद्वारे माहिती मिळताच घटना स्थळी भाव घेतला व पुढील तपास सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा