माणूस आज विकासाच्या आणि संपत्तीच्या हव्यासापोटी इतका आंधळा झाला आहे की, त्याला चांगले-वाईट, पाप-पुण्य याची जाणीवही राहिलेली नाही. पैसा, प्रसिद्धी आणि सत्ता मिळवण्याच्या नादात माणूस नैतिकतेच्या मर्यादा ओलांडत चालला आहे.
तुम्ही देवाला मानता की नाही, हे मला माहीत नाही; परंतु प्रत्येकाचे कुठे ना कुठे श्रद्धास्थान असते आणि ते असायलाही हवे. कारण आपल्या कृतींचा हिशेब देण्याची वेळ कधीतरी येऊ शकते, आपल्यापेक्षा कोणीतरी मोठी शक्ती आहे आणि ती आपल्या कर्माची दखल घेईल, ही जाणीव मनात असली तर माणूस निदान एखादे दुष्कृत्य करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल.
एक काळ असा होता की, मुलांना आई-वडिलांचा धाक होता, पती-पत्नीच्या नात्यात परस्पर आदर होता, विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आदरयुक्त धाक होता आणि या सगळ्यांच्या मनात परमेश्वराविषयी श्रद्धा होती. मात्र आज ही भीती, आदर आणि नैतिकतेची जाणीव कुठेतरी हरवत चालली आहे. प्रत्येकजण आपापल्या मनाप्रमाणे वागत आहे.
ही समस्या एखाद्या व्यक्तीपुरती किंवा विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित नाही. राजकारण असो, समाजकारण असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो, सर्वत्र पैसा आणि प्रसिद्धीचा हव्यास वाढताना दिसत आहे. या हव्यासापोटी ना माणसाची कदर उरली आहे, ना निसर्गाची!
निसर्गाचा एक साधा नियम आहे. आपण जेव्हा कोणाकडून काही घेतो, तेव्हा त्याचे ऋण फेडण्याची जबाबदारी आपल्यावर असते. मात्र निसर्गाकडून आपण आजवर भरभरून घेत आलो आहोत. त्याने आपल्याला हवा, पाणी, अन्न, निवारा आणि जगण्यासाठी आवश्यक असलेल्या असंख्य गोष्टी दिल्या. पण आपण त्याला परत काय दिले? उलट त्याच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचे काम केले आहे.
कोणत्याही गोष्टीची मर्यादा ओलांडली की तिचे परिणाम कधीतरी समोर येतातच. भीमाशंकर परिसरात होत असलेली वृक्षतोड ही केवळ झाडांची कत्तल नाही, तर निसर्गाच्या समतोलावर केलेला घाला आहे. आज विकासाच्या नावाखाली जे काही नष्ट केले जात आहे, त्याची किंमत भविष्यात नक्कीच मोजावी लागू शकते.
मात्र या जगात नेहमीच एक विचित्र वास्तव पाहायला मिळते. कृत्य एक जण करतो आणि त्याचे परिणाम मात्र दुसऱ्यालाही भोगावे लागतात. 'करतो एक आणि भरतो दुसराच' ही परिस्थिती समाजात वारंवार दिसून येते.
लोकशाही व्यवस्थेमध्ये जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी देशाचा आणि राज्याचा कारभार चालवत असतात. त्यांच्यावर जनतेच्या हिताचे रक्षण करण्याबरोबरच पर्यावरण आणि सर्व प्राणिमात्रांचे संरक्षण करण्याचीही जबाबदारी असते. सत्तेत असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे जनतेला किंवा निसर्गाला हानी पोहोचू नये, याची काळजी घेणे अपेक्षित असते.
मात्र जेव्हा लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी विसरतात आणि जनतेच्या आवाजाकडे दुर्लक्ष करतात, तेव्हा जनतेला विरोध करण्याशिवाय पर्याय उरत नाही. पण जेव्हा आपणच निवडून दिलेले प्रतिनिधी आपले ऐकत नाहीत, तेव्हा पश्चात्तापाशिवाय हाती काहीच उरत नाही.
निवडणुकीच्या वेळी एखाद्या क्वार्टरसाठी आपले मत विकणाऱ्या मतदारांना त्यांच्या निर्णयाचे परिणाम भोगावे लागतातच; परंतु त्याची शिक्षा केवळ त्यांनाच मिळत नाही, तर संपूर्ण सामान्य जनतेलाही त्याचे परिणाम सहन करावे लागतात. लोकशाहीमध्ये मताचे मूल्य किती मोठे आहे, याची जाणीव प्रत्येक मतदाराला असणे गरजेचे आहे.
परंतु निसर्गाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. निसर्ग कोणताही भेदभाव करत नाही. एखादी व्यक्ती गरीब आहे की श्रीमंत, चांगली आहे की वाईट, सत्ताधारी आहे की सामान्य नागरिक, याचा विचार निसर्ग करत नाही. निसर्गाचे संतुलन बिघडले की त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात.
आपण निसर्गाच्या विरोधात जाऊन त्याचे संतुलन बिघडवत राहिलो, तर त्याचे गंभीर परिणाम मानवजातीला भोगावे लागू शकतात. दुष्काळ, अतिवृष्टी, भूकंप, नापिकी, विविध आजार आणि महामारी यांसारख्या संकटांची तीव्रता वाढण्यामागे पर्यावरणीय असंतुलनही एक महत्त्वाचे कारण ठरू शकते.
आज कदाचित आपल्याला या गोष्टींचे गांभीर्य जाणवत नसेल; पण उद्या जेव्हा या संकटांची तीव्रता वाढेल, तेव्हा पश्चात्ताप करून काहीही उपयोग होणार नाही.
शेवटी एकच प्रश्न पडतो...
विकास कोणासाठी आणि कोणाची किंमत मोजून?
निसर्ग नष्ट करून आपण नेमके काय साध्य करणार आहोत? झाडे नसतील, जंगल नसेल, पाणी नसेल, स्वच्छ हवा नसेल, तर या संपत्तीचा आणि विकासाचा उपयोग तरी काय?
माणसाने विकास जरूर करावा; पण तो निसर्गाचा विनाश करून नव्हे, तर निसर्गासोबत समतोल राखून करावा. कारण निसर्ग वाचला तरच माणूस वाचेल आणि माणूस वाचला तरच विकासाला खरा अर्थ प्राप्त होईल.
निसर्गाचे ऋण फेडता आले नाही, तरी निदान त्याच्या अस्तित्वावर घाला घालू नये, एवढी तरी माणुसकी आपण जपली पाहिजे!

टिप्पणी पोस्ट करा