समाजसुधारकांची विचार घराघरात रुजावी यासाठी निःस्वार्थ हेतू.
प्रतिनिधी स्वाती गायकवाड
मांगूळ झनक : समाजामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, महापुरुषांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचावेत आणि विद्यार्थ्यांना सामाजिक परिवर्तनाचा इतिहास समजावा, या उद्देशाने लहु गर्जना ग्रुप, मांगूळ झनक यांच्या वतीने अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विविध समाजसुधारक, साहित्यिक आणि महापुरुषांची पुस्तके नागरिकांना मोफत वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या पुस्तकांमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्यासह महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर लहुजी साळवे, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, मुक्ताबाई साळवे स्वामीविवेकानंद तसेच विविध संत व समाजसुधारकांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे.
‘पुस्तक वाचा, विचार समजा आणि समाज घडवा’ या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा विशेषतः विद्यार्थी, युवक-युवती आणि वाचनाची आवड असलेल्या नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आजच्या डिजिटल युगात मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे पुस्तक वाचनाची सवय कमी होत असताना*, नव्या पिढीला महापुरुषांचे विचार, संघर्ष आणि सामाजिक कार्य समजावे, त्यातून प्रेरणा मिळावी आणि समाजामध्ये वैचारिक जागृती निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
*या उपक्रमाचे आयोजक म्हणून लहु गर्जना ग्रुप सदस्य ज्ञानेश्वर भगवान गायकवाड, पवन उत्तम कांबळे, विष्णु गोपाल कांबळे, राहुल बाळु कांबळे, आणि आकाश केशव कांबळे हे कार्यरत आहेत.
लहु गर्जना ग्रुपच्या या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद देऊन अधिकाधिक पुस्तके वाचावीत आणि वाचन संस्कृतीला चालना द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा